ह्या पुस्तिकेमध्ये श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय 12 वा आणि अध्याय 15 वा हे दोन अध्याय आलेले असून, पठनास सुलभता येण्यासाठी ह्या पुस्तिकेमध्ये उजव्या बाजूस संस्कृत श्लोक व डाव्या बाजूस त्या श्लोकांची संधि-समास फोड व पदांचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे श्लोकातील अवघड शब्दामध्ये कोणकोणती पदे आहेत हे वाचकांच्या लगेचच लक्षात येते व श्लोकांचे उच्चारण करणे सोपे होते. अनुस्वाराचा शास्त्रोक्त उच्चार कसा करावा ह्याविषयीचे संकेतदेखील त्या-त्या श्लोकांच्या समोर दिलेले आहेत व शेवटी दोन्ही अध्यायांचा सुबोध सारांश दिलेला आहे. ह्या अभिनव रचनेमुळे ही पुस्तिका गीता-पठनासाठी नवसाधकांना व विशेषकरून विद्यार्थीवर्गांस अत्यंत उपयुक्त ठरावी.
Reviews
There are no reviews yet.