कवि श्रीशंकरनंदन

करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मीच्या कोल्हापूर येथील मंदिरात दररोज रात्री खालील शेजारती म्हटली जाते. त्यानंतर निद्राविडा म्हटला जातो व मंदिर बंद होते. ही आरती कवि श्रीशंकरनंदन यांनी रचलेली आहे. बहुतेक प्रत्येक कवनामधील समाप्तिमुद्रेत कवी आपले नाव गुंफत असतो. त्यानुसार ह्या शेवटच्या पदातील समाप्तिमुद्रेमध्ये “तत्पदीं शंकरनंदन” येथे ‘शंकरनंदन’ अर्थात ‘शंकर ह्यांचा मुलगा’ ह्या अर्थाने जे नाव आलेले आहे त्यांच्याविषयीची माहिती आम्ही संकलित करत आहोत. ती प्राप्त होताच येथे प्रसिद्ध करण्यात येईल. ह्यांच्यासंदर्भातील माहिती कोणाकडे उपलब्ध असेल तर कृपया खालील कॉमेंट बॉक्समध्ये माध्यमातून आम्हाला अवश्य कळवावे.

करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी (आरती)
निर्गुण निश्चल निष्कल जें तें तूं त्रिगुणा। सर्वस्याद्या तुजला म्हणती जन सगुणा। दिसती जग तंव अंगीं मणिगण जेवीं गुणा। जाणुनि योगी मुनि जन जाणती याची खुणा॥१॥
जय देवि जय देवि जय चित्सुखसदने। जय करवीरनिवासिनि कमले शशिवदने॥ जय देवि॥ध्रु0॥
फिरती रवि शशि गगनीं करी अंबुद वृष्टि। तुझेनि आज्ञें निर्मित कमलोद्भव सृष्टि। कमलाकर हर वांच्छिति त्वत्करुणादृष्टि। त्वत्करलेखन हरिहरविधिच्या अदृष्टीं॥२॥ जय देवि॥
मस्तकीं लिंग महीधर हस्तकीं दिव्य गदा। खेटक हाटक पात्रक मातुलिंग सदा। विलसे श्रीमुख सुंदर पाहता मोह मदा। वारुनि दे सुख शाश्वत भवभय नाहीं कदा॥३॥ जय देवि॥
व्युत्पत्ति गर्व विसर्जूनि त्वत्पद जे ध्याति। तत्पर होता सत्पथीं चित्सुख ये हातीं। उत्पत्ति-प्रलयाविरहित अखंड जे राहती। तत्पद शंकरनंदन स्तवितो दिनरातीं॥४॥ जय देवि॥
जय जगदंबे माझे आई
मजला ठाव द्यावा पायीं
जय जगदंबे माझे आई
मजला ठाव द्यावा पायीं
जय जगदंबे माझे आई
मजला ठाव द्यावा पायीं
जय जगदंबे माझे आई
मजला ठाव द्यावा पायीं
जय जगदंबे माझे आई
मजला ठाव द्यावा पायीं
हर हर हर हर हर हर


कवि श्रीनारायण महाराज रचित श्रीमहालक्ष्मी-निद्राविडा

करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी (निद्राविडा)
निद्रा करि मंची। जगदंबे पालितभक्तकदंबे॥ निद्रा करि मंची॥
साधनचतुष्टय खुर चार। गाथे अर्थरुचिर। विणला सत्संगें सुंदर।
श्रद्धातुलीवर॥१॥ निद्रा करि मंची॥
अद्वयभक्ति हे कुसुमाली। अंबे वर अस्तरली। अद्भुतबोध उशी लघुतुली। विवेकविरक्तें भरली॥२॥ निद्रा करि मंची॥
अनुभवदीप महा सोज्ज्वळ। अभ्यास हें तैल। वाती अहंममता प्रकाश। भासे जग गतमल॥३॥ निद्रा करि मंची॥
षड्रिपु सुपारी फोडून। सत्त्वात्मक मन पान। अहंता जाळून लावियले। जगदंबे! वरि चूर्ण॥४॥ निद्रा करि मंची॥
शुद्धबुद्धी हे जायफळ। लवंग तुर्या विमल। सत्त्व हा खदिर अति-धवल। अर्क गुणाचा निर्मळ॥५॥ निद्रा करि मंची॥
अंबे तांबुल हा घेणे। सर्वां आज्ञा देणें। श्रीरामचरणसह शयने। विनवी नारायण॥६॥ निद्रा करि मंची॥
जगदंबे पालितभक्तकदंबे॥ निद्रा करि मंची॥
राम राम राम हरि राम राम राम
राम राम राम हरि राम राम राम
मंगलमूर्ती मोरया
नारायणि नारायणि नारायणि
अंबा माता की जय
सब संतन की जय
बाल गोपाल की जय
श्रीमहालक्ष्मी की जय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *