Sale!

अधिकमासप्रदीप

Original price was: ₹80.00.Current price is: ₹60.00.

+ Free Download

सध्याच्या पिढीस अधिकमासाचे माहात्म्य व तदंगभूत व्रताचार ह्यांची परिपूर्ण माहिती करून देण्याच्या प्रयत्नातून हे पुस्तक साकारले आहे. ह्या पुस्तकात विविध धर्मशास्त्रीय ग्रंथांतून विखुरलेल्या अधिकमासविषयक शास्त्रसंकेतांचे व पुराणग्रंथांतून वर्णन केलेल्या व्रताचाराचे सद्यःकालास अनुरूप असे मुद्देसूद संकलन केलेले आहे. ‘अधिकमास-प्रदीप’ ह्या समग्रमाहितीपूर्ण पुस्तकाच्या वाचनानंतर अधिकमासाविषयी असलेल्या संदेहरूपी अंधकाराचा निरास तर होईलच पण अधिकमासाविषयी अन्य काही जाणून घेणे शिल्लक उरणार नाही अशी उमेद वाटते.

Category:
somdn_product_page

दरवेळी सुमारे तेेहतीस महिन्यांनी येणार्‍या अधिकमासाविषयी प्राचीन काळी जेवढी कुतूहलयुक्त जिज्ञासा होती तेवढीच ती आजही जनमानसात टिकून आहे. सर्वसामान्यांच्या मनांत अधिकमासाविषयी नेहमी उद्भवणारे प्रश्न म्हणजे, अधिकमास म्हणजे नेमके काय? ह्या महिन्याला विविध नावे का पडली? हा महिना स्वागतार्ह आहे का त्याज्य? ह्या महिन्यात नेमकी कोणती कार्ये करावीत व कोणती टाळावीत? धार्मिक व्रताचरण कसे ठेवावे? ह्या महिन्यातील व्रतादिकांचे विधिविधान व फलश्रुती काय? ह्या व अशा सर्वप्रश्नांची उत्तरे ह्या पुस्तकात दिलेली आहेत. शिवाय अधिकमासाची व्रतपूजा व व्रतकथाही दिलेली आहे. ह्या महिन्यात विशेषकरून करण्यात येणार्‍या भागवतसप्ताहाचाही माहिती व संकल्प दिलेला आहे.

Weight100 g
Shopping Cart