जेव्हा वेळेअभावी संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसते तेव्हा त्या ग्रंथातील 11व्या अध्यायाचे पठन केले जाते. कारण हा अध्याय साक्षात रुद्रस्वरूप मानला जातो. म्हणूनच स्नानोत्तर पवित्र होऊन एकांतात शिवाची पूजा करून हा अध्याय पठन करतात. त्यावेळी शिवपूजेत बेलाची पाने, शुभ्र फुले, दूध, शुद्ध जल, दही-भाताचा नैवेद्य इ. गोष्टींचा यथासंभव अंतर्भाव करतात. ॐ नमः शिवाय/ नमः शिवाय ह्या षडक्षरी/पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करतात. ह्या अध्यायाच्या पठनाने तसेच केवळ श्रवणानेही रुद्रपाठाचे पुण्य प्राप्त होते व शिवकृपेने समस्त इहपर कामनापूर्ती होऊन शिवसायुज्य प्राप्त होते. पुस्तिकेची रचना अभिनव असून अर्थ जाणून घेत अध्यायाचे पठन-मनन व्हावे म्हणून तेथेच विश्लेषणात्मक अर्थही दिलेला आहे. शिवाय मोठी अक्षरे, दर्जेदार कागद, बहुरंगी छपाई ही वैशिष्ट्ये आहेतच.
Reviews
There are no reviews yet.