दरवेळी सुमारे तेेहतीस महिन्यांनी येणार्या अधिकमासाविषयी प्राचीन काळी जेवढी कुतूहलयुक्त जिज्ञासा होती तेवढीच ती आजही जनमानसात टिकून आहे. सर्वसामान्यांच्या मनांत अधिकमासाविषयी नेहमी उद्भवणारे प्रश्न म्हणजे, अधिकमास म्हणजे नेमके काय? ह्या महिन्याला विविध नावे का पडली? हा महिना स्वागतार्ह आहे का त्याज्य? ह्या महिन्यात नेमकी कोणती कार्ये करावीत व कोणती टाळावीत? धार्मिक व्रताचरण कसे ठेवावे? ह्या महिन्यातील व्रतादिकांचे विधिविधान व फलश्रुती काय? या व अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे ह्या पुस्तकात दिलेली आहे. ‘अधिकमास-प्रदीप’ ह्या समग्रमाहितीपूर्ण पुस्तकाच्या वाचनानंतर अधिकमासाविषयी असलेल्या संदेहरूपी अंधकाराचा निरास तर होईलच पण अधिकमासाविषयी अन्य काही जाणून घेणे शिल्लक उरणार नाही अशी उमेद वाटते.