दरवेळी सुमारे तेेहतीस महिन्यांनी येणार्या अधिकमासाविषयी प्राचीन काळी जेवढी कुतूहलयुक्त जिज्ञासा होती तेवढीच ती आजही जनमानसात टिकून आहे. सर्वसामान्यांच्या मनांत अधिकमासाविषयी नेहमी उद्भवणारे प्रश्न म्हणजे, अधिकमास म्हणजे नेमके काय? ह्या महिन्याला विविध नावे का पडली? हा महिना स्वागतार्ह आहे का त्याज्य? ह्या महिन्यात नेमकी कोणती कार्ये करावीत व कोणती टाळावीत? धार्मिक व्रताचरण कसे ठेवावे? ह्या महिन्यातील व्रतादिकांचे विधिविधान व फलश्रुती काय? या व अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे ह्या पुस्तकात दिलेली आहे. ‘अधिकमास-प्रदीप’ ह्या समग्रमाहितीपूर्ण पुस्तकाच्या वाचनानंतर अधिकमासाविषयी असलेल्या संदेहरूपी अंधकाराचा निरास तर होईलच पण अधिकमासाविषयी अन्य काही जाणून घेणे शिल्लक उरणार नाही अशी उमेद वाटते.
Related products
श्रीगणेशचतुर्थी-व्रतपूजा
₹0.00 Downloadह्या पुस्तिकेत श्रीगणेशपूजनाची पूर्वतयारी, पूजेचे पूर्वांग, साहित्याची जोडणी, व्रतोद्देश, पूजेची मांडणी व पूजोपचारांचे मंत्र ह्या सर्व गोष्टींचा ऊहापोह केलेला असून गुरुजी उपलब्ध झाले नाही तर ह्या पुस्तिकेवरून श्रीगणेश-प्राणप्रतिष्ठा व पूजा करणे सहजशक्य होते.







