’वेदवाणी‘ विषयी

धर्मस्य तत्वं निहीत गुहायाम्” ह्या उक्तीनुसार धर्माची मूलतत्वे सर्वथा अज्ञानातच राहिलेली आहेत. तथापि ज्या समाजधुरिणांनी धर्म संस्कृती व भारतीय विचारधन अत्यंत परिश्रमपूर्वक जतन करून ठेवले त्याचाच मागोवा घेत धर्मांतर्गत येणारे आचार-विचार, साधना-उपासना, व्रतवैकल्ये-संस्कार इत्यादी अनेक पैलू उकलून दाखविण्याचे व्रत आम्ही घेतलेले आहे. त्यानुसार प्राचीन परंपरेची कास धरून पण आधुनिक विचारसरणीस अनुसरून धर्मजागरण करणे हे उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलेले आहे. सर्वतोपरी समाज जागृती समोर ठेवलेली असल्यामुळे व्यापारीकरणास मुरड घालून उत्कृष्ट दर्जा व माफक मूल्य असलेले समाजोपयोगी व पिढ्यानपिढ्या टिकणारे ग्रंथ प्रकाशित करणे ह्या कार्याला आम्ही वाहून घेतलेले आहे. ही सेवा अशीच अविरतपणे सुरू राहावी केवळ हीच करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मीचरणी विनम्र अभ्यर्थना !!

🔆 ग्रंथसूची 🔆

0