: No Items in your Cart

प्रकाशने

नित्य आह्निक, नित्य-नैमित्तिक आराधना, व्रतवैकल्ये, संस्कार, अंत्येष्टी, अशौच, श्राद्ध तसेच दैनंदिन प्रापंचिक राहाटी ह्या प्रांतांत उद्भवणार्‍या शंका-समस्यांचे विविध स्तरांवरून समाधानकारक निराकरण करणारा; सर्वाधिक खपाचा बहुमान प्राप्त झालेला, अवडंबर टाळून अत्यावश्यक असे धर्मपालन कसे करावे ह्याबाबत मार्गदर्शक ठरल्यामुळे प्रत्येकास आपलासा वाटणारा एकमेव बहुमोल ग्रंथ.

200

आचारसंहिता, साधना व उपासना, संस्कार, आरोग्य व धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र व वास्तुशांती, ज्योतिषशास्त्र आणि अंत्येष्टी तसेच दैनंदिन प्रापंचिक-राहाटी ह्या प्रांतांत उद्भवणार्‍या शंका-समस्यांचे विविध स्तरांवरून समाधानकारक निराकरण करणारा; अवडंबर टाळून अत्यावश्यक असे धर्मपालन कसे करावे ह्याबाबत मार्गदर्शक ठरल्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीस आपलासा वाटणारा एकमेव बहुमोल ग्रंथ.

200

गुढीपासून होलिकोत्सवापर्यंत वर्षभरातील सर्व महत्त्वाच्या व्रतपूजांचा समावेश असलेला; तसेच साहित्याची जोडणी व मांडणी, व्रतदेवता, व्रतकाल, संकल्प, उपचारमंत्र, तंत्र, कृती आणि व्रतकथा अशा विविध अंगोपांगांनी प्रत्येक पूजेचे विवरण असलेला; हाताशी असता कोणत्याही व्यक्तीस वर्षभरातील अावश्यक त्या पूजा स्वतः करणे सुकर होईल असा नेटका, सहजगम्य व बहूपयोगी ग्रंथ.

150

श्रीगजाननविजय ह्या दिव्य ग्रंथातील प्रत्येक ओवीचे गद्य रूपांतर, त्यांतील कठीण शब्दांचे अर्थ व संकल्पनांचे स्पष्टीकरण, आवश्यक त्या ठिकाणी माहितीपूर्ण व उद्बोधक तळटिपा, पात्रांची व प्रसंगांची आकर्षक रेखाचित्रे तसेच महाराजांचे नित्यवंदनीय बहुरंगी चित्र, पारायणाचे संकल्पविधान व महाराजांचे विविधांगी दर्शन घडवणारे परिशिष्ट; असा सर्वांगपरिपूर्ण आकर्षक व उपयुक्‍त ग्रंथ

200

श्रीज्ञानेश्वरमाउलीकृत हरिपाठाची शास्त्रशुद्ध अभंगरचना व त्या अभंगांचा संतमान्य भावार्थ, गुरुपरंपरेचे अभंग, संतपर अभंग, निवडक आरत्या, वंदन-मागणे-विनवणी, पसायदान व भावार्थ, पांडुरंगाष्टकम् तसेच नित्यवंदनीय बहुरंगी चित्रे ह्या सर्वांचा समावेश असलेली, नित्यपठणास सुलभ अशी, मोठ्या टाइपातील आकर्षक आवृत्ती.

12

महाप्रासादिक व शीघ्रप्रत्ययकारी अशा ‘देवीमाहात्म्य’ अर्थात ‘श्रीदुर्गासप्तशती’ ह्या ग्रंथाची मूळ संस्कृत शास्त्रशुद्ध संहिता, त्या संहितेचे तंतोतंत रोचक मराठी भाषांतर, सप्तशतीच्या अंगोपांगांचे विवेचन करणारे नित्योपयोगी परिशिष्ट व अध्यायवार आकर्षक बहुरंगी चित्रे, प्रमुख कुलदेवतांची चित्रे, सप्तशतीमहायंत्र व नवार्णयंत्र ह्यांचा समावेश असलेला विलोभनीय ग्रंथ.

200

श्रीदुर्गासप्तशती ह्या संस्कृत ग्रंथाच्या मूळ संस्कृत संहितेप्रमाणेच काव्यमयता, ओजस्विता व प्रासादिकता साधलेला प्राकृत ग्रंथ; अध्यायवार आकर्षक बहुरंगी चित्रे, प्रमुख कुलदेवतांची चित्रे, सप्तशतीमहायंत्र व नवार्णयंत्र; ज्यांना इहपर कल्याण; प्रापंचिक व पारमार्थिक लाभ तसेच सांसारिक व आध्यात्मिक उन्नती साध्य करावयाची आहे पण संस्कृत श्रीदुर्गासप्तशती (देवीमाहात्म्य) पठनात गती नाही अशा देवीभक्तांना नित्यपठनास सुयोग्य असा ग्रंथ.

100

देवीमाहात्म्यातील ब्रम्हकृतस्तुती, शक्रादिकृतस्तुती, देवकृतस्तुती, नारायणीस्तुती; पठणास साहाय्यभूत ठरणारा श्लोकांचा पदच्छेद, देवीकवचादी व रहस्यत्रयादी स्तोत्रे, अनुस्वारांचे शास्त्रशुद्ध उच्चारण, महिषासुरमर्दिनीस्तोत्र व अन्य दुर्गास्तोत्रे, स्तोत्रांचा मराठी अर्थ - ह्या सर्व गोष्टींचा समावेश असलेले; नित्य देव्युपासनेस व आपल्या कुलदेवतेच्या उपासनेस उपयोगी ठरणारे पुस्तक.

50

नवसाधकांना व विशेषकरून शालेय विद्यार्थिवर्गास भगवद्गीतेतील अध्याय 12 वा आणि अध्याय 15 वा हे दोन अध्याय शास्त्रशुद्ध पद्धतीने मुखोद्गत व्हावेत ह्यासाठी उजव्या बाजूस संस्कृत श्लोक आणि डाव्या बाजूस संधिसमासांची ङ्गोड व पदांचा अर्थ, अनुस्वारांच्या शास्त्रोक्त उच्चाराचे संकेत आणि शेवटी दोन्ही अध्यायांचा सुबोध सारांश - अशी अभिनव रचना असलेली एकमेेव पुस्तिका

10

नमक-चमकात्मक रुद्राध्याय व स्वाहाकार शिवाय लघुन्यास, शिवसंकल्पसूक्त, शिवमहिम्नस्तोत्र, महामृत्युंजय-जपविधान, शिवाष्टोत्तरशतनामावली व बिल्वाष्टक ह्या सर्व गोष्टींचा समावेश असलेली ह्या प्रांतातील एकमेव पुस्तिका.

25

लक्ष्मीप्राप्ती तथा गृहशांती, मनःशांती व समृद्धीसाठी पठन केली जाणारी श्रीसूक्‍ताची शास्त्रशुद्ध पाठभेदांची संहिता, श्रीसूक्‍तस्वाहाकार, षोडशोपचारपूजा व विविध कामनापूर्तीसाठी प्रत्येक मंत्राचा विनियोग तसेच शास्त्रोक्‍त श्रीयंत्र व कुबेरयंत्र ह्या सर्वांचा समावेश असलेली पुस्तिका.

20

अधिकमास-संकल्पना, कार्याकार्य विचार व आचरणसंहिता, स्नान-दान-पूजा-व्रतांचे महत्त्व व विधी, ज्योतिषशास्त्रीय व धर्मशास्त्रीय महत्त्व, नित्यपठनीय प्राकृत ओवीबद्ध अधिकमासमाहात्म्य असलेली प्रासादिक पोथी

30

श्रीधरस्वामींच्या घराण्यातील परंपरागत हस्तलिखित पोथी व समकालीन हस्त-लिखित पोथी व स्कंदपुराण (ब्रह्मोत्तरखंड) ह्या त्रयींच्या आधारे संशोधित केलेली संहिता, सुरस व रोचक गद्यरूपांतर, कठीण शब्दांचे अर्थ, माहितीपूर्ण तळटीपा, अध्यायवार आकर्षक चित्रे अशा वैशिष्ट्यांनी नटलेला शिवाय उत्कृष्ट छपाई, ठळक टाईप व मजबूत बांधणी ह्या मूलभूत गोष्टी असलेला सर्वांगपरिपूर्ण प्रासादिक ग्रंथ.

300

श्रीक्षेत्र कडगंची येथील सायंदेव घराण्यात सांप्रत उपलब्ध झालेल्या मूळ हस्तलिखित प्रतीवरून प्रस्तुत श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे संपादन केलेले असून प. पू. श्रीटेंबेस्वामी ह्यांचे समश्लोकी गुरुचरित्र तसेच अनेक जुन्या हस्तलिखित पोथ्या ह्यांचा ह्या ग्रंथासाठी आधार घेतलेला आहे. सिद्धहस्त चित्रकार कै. श्री. जि. भि. दीक्षित ह्यांनी रेखाटलेल्या प्रासादिक चित्रांचा समावेश ह्या ग्रंथात केलेला आहे. शिवाय कठीण शब्दांचे अर्थ, माहितीपूर्ण तळटीपा, उत्कृष्ट छपाई, ठळक टाईप व मजबूत बांधणी असलेला हा सर्वांगपरिपूर्ण ग्रंथ; प्रासादिक ठरला आहे.

500