वेदवाणी प्रकाशन.

’धर्मस्य तत्वं निहीत गुहायाम्’ या उक्तीनुसार धर्माची मुलतत्वे सर्वथा अज्ञानातच राहिलेली आहेत. तथापि ज्या समाजधुरिणांनी धर्म संस्कृती व भारतीय विचारधन अत्यंत परिश्रमपुर्वक जतन करुन ठेवले त्याचाच मागोवा घेत धर्मांतर्गत येणारे आचार-विचार,साधना-उपासना,व्रतवैकल्ये-संस्कार इत्यादी अनेक पैलु उकलुन दाखविण्याचे व्रत आम्ही घेतलेले आहे त्यानुसार प्राचीन परंपरेची कास धरुन पण आधुनिक विचारसरणीस अनुसरुन धर्मजागरण करणे हे आमचे धेय आहे.असे असताना आम्ही सर्वतोपरी समाज जागृती समोर ठेवलेली असल्यमुळे व्यापारीकरणास मुरड घालुन उत्कृष्ट दर्जा व माफक मुल्य असलेली पुस्तके करणे या कार्याला आम्ही वाहुन घेतलेले आहे. आता महाराष्ट्र व अन्य राज्ये तसेच भारताबाहेरही आमची पुस्तके लोकप्रिय होत असुन गेल्या बाविस वर्षांपुर्वी रुजलेल्य बीजाचा आत वृक्ष झालेला आहे. या प्रकाशनातर्फे आजपर्यंत बारा पुस्तके प्रसिद्ध झालेली असुन नवनवीन विषयावर सखोल संशोधन करुन पुस्तके प्रकाशित होत आहेत.